Sunday 24 November 2019

 अनाकलनीय

खरतर आज हा लेख लिहिताना, वरील शिर्षकाप्रमाणे महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती 'अनाकलनीय' अशीच आहे. जे आणि ज्याप्रकारे घडतंय ते सामान्य माणसाच्या  समजण्यापलीकडे आहे, पण वेदनदायी नक्कीच आहे.

राजकारणात नैतिकतेचा ऱ्हास होतो आहे किंवा झाला आज हे आजवर फक्त ऐकत होतो पण आजचा महाराष्ट्रातील किंवा भारतातील राजकारण बघता किती जास्त लयाला गेल आहे याची कल्पना झाल्याशिवाय राहत नाही.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर BJP-105, SS-56, NCP-54, INC-44 अशी साधारण परिस्थिती होती. मॅजिक फिगर साठी लागणारा 145 हा आकडा 2 किव्वा 3 पक्ष एकत्र आल्याशिवाय गाठणं अशक्य होतं. तसेच निवडून आलेल्या पक्षांच्या आपल्या काही वैयक्तीक अपेक्षा सुद्धा होत्या त्यामुळे दबावतंत्राचा उपयोग सुरू झाला, तेव्हा प्रत्येक पक्ष आपली bargaining power वाढवण्याचा प्रयत्न करताना दिसत होते तर काही आपल्या शर्तीवर दुसऱ्या पक्षाने सोबत यावे यासाठी प्रयत्नशील होते. काहींनी जनमताच ऐकून  विरोधी बाकावर बसण्याच ठरवल्याचं  दर्शवत होते. त्यानुसार शिवसेना 50:50 फॉर्म्युला लागू करण्याची मागणी करत होती तर NCP  अप्रत्यक्षरीत्या शिवसेनेला सोबत सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करत होती. वर काहीही न दाखवता पडण्यामागे बरच काही चालू होता. आणि शिवसेना जवळ येताच कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार करण्यासाठी वेळ घेणं आणि काँग्रेस ला बाहेरून पाठिंबा न देता सरकार मध्ये यायला तयार करणं असा सगळा प्रकार चालू होतं.

हे पाहत असताना एक दृष्टीने बरं ही वाटत होतं कि काही पक्ष आपली ओळख सोडून काही चांगल्या हेतूने एकत्र येण्याचं प्रयत्न करताहेत, पण दुसऱ्या बाजूने अस ही वाटत होतं कि ज्या युतीला बहुमत मिळालं त्याचा अपमान होतो आहे, जे काही प्रमाणात चुकीचेच आहे.

शेवटी पक्षांनी के करावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असू शकतो पण ज्या मुद्द्यांवर निवडणूक लढविली जाते त्याची वैयक्तिक स्वार्थासाठी अवहेलना होता काम नये.

या सर्व नाट्य घडामोडी ज्या आजवर घडल्यात आणि येणाऱ्या काळात घडतीलही त्याहून सामान्य माणसाच्या मनात हा प्रश्न येणं अतिशय साहजिक आहे कि, ' या सर्व प्रकारात 'मी' कुठे आहे ? माझा विचार कुणी करतय का ?किव्वा मी लोकशाहीत दिलेल्या माझा मताला काही किंमत आहे का ? '. प्रश्न जटील आहेत.

कारण सामान्य माणसाने दिलेल्या मताचा भरवशावर ही नेते मंडळी अधिकार मिळवतात आणि नंतर त्या अधिकाराचा उपयोग स्वकल्याणासाठी करताना दिसतात. तसेच  पक्ष देखी सरकार स्थापण्याची अक्षरशः घोडेबाजार मांडताना दिसतात ज्यात समर्थन मिळवण्यासाठी जनतेचा पैशांची लूट केल्या जाते.

मग अशी ढासळलेली नैतिकता पाहून वेदना तर नक्कीच होतात पण ज्या लोकशाही चा आपण जगात अभिमान बाळगतो 'हीच ती लोकशाही का ?' असा प्रश्न पडतो. आणि ज्या भारताचं स्वप्न महात्मा गांधी, सरदार पटेल, नेहरुजी, सुभाषचंद्र बोस, आंबेडकर सारख्या महान नेत्यांनी पाहलं, तो हाच भारत आहे का ? किंवा आपण त्या मार्गावर तरी आहोत का अशी अनेक प्रश्न मनाला घर करून जातात.

पण असं सर्व असताना आपण सामान्य जनतेने काय करावं ? असा प्रश्न आपल्या सर्वांना नक्कीच पडला असेल. याचं उत्तर अगदी सोपं आहे, आपण आपली सदसद्विवेकबुद्धी जागृत ठेवणं. कोणत्याही कृतीला समर्थन देण्याआधी तटस्थ राहून विचार करणं. तसेच निवडणुकीत मत नोंदवताना पक्ष अथवा उमेदवार कोणत्या मुद्यांसाठी मत मागतायत आणि त्याने आपल्या दैनंदिन जीवनावर किती चांगला फरक पडू शकतो याचा विचार करून मत देने.आणि निवडून आल्यावर ही कितपत काम केलं या निकषावर पुढील निवडणुकीत मत देने. असा केल्यास आपली आपल्या लोकशाही चा विजय तर नक्कीच होईल पण सर्वांगीणन विकास सुद्धा शक्य होईल.

आणि सध्याचा महाराष्ट्राचा राजकीय परिस्थिचा विचार केल्यास फक्त एवढाच  म्हणावसं वाटतं की,
' Let's just wait and watch '.